esakal | अर्थव्यवस्था रुळावर येण्यास सुरवात; विविध निदर्शकांच्या हवाल्याने सरकारचा दावा 
sakal

बोलून बातमी शोधा

अर्थव्यवस्था रुळावर येण्यास सुरवात; विविध निदर्शकांच्या हवाल्याने सरकारचा दावा 

केंद्र सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने योग्य वेळी घेतलेल्या निर्णयांमुळे अर्थव्यवस्थेला कमीत कमी फटका बसून तिला पुन्हा ऊर्जितावस्था प्राप्त होईल, असा विश्‍वासही अर्थ मंत्रालयाने आज व्यक्त केला.

अर्थव्यवस्था रुळावर येण्यास सुरवात; विविध निदर्शकांच्या हवाल्याने सरकारचा दावा 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली - अर्थव्यवस्था पुन्हा एकदा रुळावर येण्यास सुरवात झाली असून, त्याची चिन्हे मे आणि जून महिन्यात दिसू लागली असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. विजेचा वाढता वापर, इंधन वापर, मालवाहतुकीत झालेली वाढ अशा चौदा निदर्शकांचा आधार घेत केंद्रीय अर्थ मंत्रालयाने हा निष्कर्ष काढला असून, त्याबाबत निवेदन प्रसिद्ध केले आहे. हे निदर्शक सेवा, अर्थ, कृषी अशा विविश क्षेत्रांमधील आहेत. लॉकडाउनची कठोर अंमलबजावणी आणि सोशल डिस्टन्सिंग यामुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसल्याचेही अर्थ मंत्रालयाने मान्य केले. मात्र, केंद्र सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने योग्य वेळी घेतलेल्या निर्णयांमुळे अर्थव्यवस्थेला कमीत कमी फटका बसून तिला पुन्हा ऊर्जितावस्था प्राप्त होईल, असा विश्‍वासही अर्थ मंत्रालयाने आज व्यक्त केला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

विद्यमान परिस्थिती 
भारताची अर्थव्यवस्था आकुंचन पावण्याची चिन्हे असून, पहिल्या तिमाहीमध्ये तिच्यात ७ टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज आहे. एकूण देशांतर्गत उत्पादन वाढीचा वेग केवळ ४.२ टक्के होता. गेल्या अकरा वर्षांतील हा सर्वांत कमी वेग आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

अर्थव्यवस्था वाढीचे निदर्शक 

१. विजेचा वापर : 
एप्रिल : सरासरीपेक्षा २४ टक्के वापर कमी 
जून : सरासरीपेक्षा केवळ ६.२ टक्के कमी 

२. पेट्रोलियम उत्पादनांचा वापर 
एप्रिल : ९९ लाख मेट्रिक टन 
मे : १.४५ कोटी मेट्रिक टन 

३. रेल्वे माल वाहतूक 
एप्रिल : ८.२५ कोटी रुपये 
मे : ३६.८४ कोटी रुपये 
जून (२० तारखेपर्यंत) : ४९.८ कोटी रुपये 

४. डिजिटल व्यवहार 
एप्रिल : ६.७१ लाख कोटी रुपये 
मे : ९.६५ लाख कोटी रुपये 

५. कॉर्पोरेट बाँड्‌स 
एप्रिल : ०.५४ लाख कोटी 
मे : ०.८४ लाख कोटी 

६. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक 
एप्रिल : २३.५ लाख कोटी 
मे : २४.२ लाख कोटी 

७. टोल वसुली 
एप्रिल : ८.२५ कोटी 
मे : ३६.८४ कोटी 

८. गहू खरेदी : सरकारकडून विक्रमी (३८२ लाख मेट्रिक टन) गहू खरेदी 

९. वन उत्पादने : सरकारकडून विक्रमी ७९.४२ कोटी रुपयांची खरेदी 

१०. खते विक्री : 
गेल्या वर्षीच्या तुलनेत ९८ टक्के अधिक विक्री 

११. खरीप पेरणी 
गेल्या वर्षीच्या तुलनेत ३९ टक्के अधिक भागावर पेरणी 

१२. पीपीई किट : भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा उत्पादक देश बनला. 

१३. अडचणीच्या काळात ५०७ अब्ज डॉलरच्या परकी गंगाजळीचा अर्थव्यवस्थेला मोठा आधार. 

१४. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने ११ मार्च नंतर प्रथमच ३५ हजार अंकांचा टप्पा ओलांडला.