
जर तुम्ही केंद्र सरकारचे कर्मचारी असाल आणि तुमच्या वृद्ध पालकांच्या देखभालीबाबत काळजीत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी २४ जुलै २०२५ रोजी राज्यसभेत सांगितले की, केंद्रीय कर्मचारी आता त्यांच्या वृद्ध पालकांची सेवा करण्यासह कोणत्याही वैयक्तिक कारणासाठी ३० दिवसांची अर्जित रजा घेऊ शकतात.