

Padma Awards 2026 List
ESakal
प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी केंद्र सरकारने पद्म पुरस्कार २०२६ ची घोषणा केली. घोषणेनुसार, अंके गौडा, आर्मिडा फर्नांडिस, भगवानदास रायकर, भिक्ल्या लाडक्या धिंडा, ब्रिजलाल भट्ट, बुधरी थाठी, चरण हेम्ब्रम, चिरंजी लाल यादव आणि धर्मलाल चुन्नीलाल पंड्या यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अनसंग हिरोज श्रेणीमध्ये सुमारे ४५ जणांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.