

Centre Restricts Certain Cold and Cough FDCs for Kids Under 4
ESakal
केंद्र सरकारने लहान मुलांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. सरकारने चार वर्षांखालील मुलांसाठी सर्दी आणि फ्लूच्या औषधांच्या वापरावर बंदी घातली आहे. सरकारने क्लोरफेनिरामाइन मॅलेट आणि फिनाइलफ्राइन हायड्रोक्लोराइड असलेल्या सर्व निश्चित-मात्रेच्या मिश्रणांवर बंदी घातली आहे, जी सामान्यतः सर्दीसाठी दिली जातात. मुलांच्या सुरक्षिततेबद्दल आणि संभाव्य दुष्परिणामांबद्दल गंभीर तक्रारींनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.