मंकीपॉक्सच्या धोक्यांबाबत केंद्र सरकारचा राज्यांना इशारा; गाईडलाईन्स जारी | Central government health secretary writes to states guidelines in monitoring monkeypox as cases rise | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Monkeypox

मंकीपॉक्सच्या धोक्यांबाबत केंद्र सरकारचा राज्यांना इशारा; गाईडलाईन्स जारी

नवी दिल्ली - जगात मंकीपॉक्सचा वाढता धोका लक्षात घेता भारत सरकार सावध झालं आहे. गुरुवारीच केंद्र सरकारने राज्यांना मंकीपॉक्सबाबत इशारा दिला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि आरोग्य सचिवांना पत्र लिहून आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत. (monkeypox news in marathi)

परदेशातून येणार्‍या लोकांवर सतत मांकीपॉक्ससाठी लक्ष ठेवले जाते आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशपासून केरळपर्यंत काही लोकांमध्ये मंकीपॉक्सचे लक्षणे दिसून आली होती. मात्र सुदैवाने भारतात अद्याप त्याचा एकही रुग्ण आढळलेला नाही.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी गुरुवारी सांगितले की, रुग्णाचे नमुने गोळा करण्यात आले असून ते नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, मंकीपॉक्स हा प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरणारा संसर्गजन्य रोग आहे आणि त्याची लक्षणे कांजन्याच्या रुग्णांसारखीच असतात.

हेही वाचा: शिंदे सरकारचा मोठा निर्णय; पेट्रोल ५ तर डिझेल ३ रुपयांनी स्वस्त

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) अलीकडेच म्हटंल की, मंकीपॉक्सच्या रुग्णांच्या संख्येत आठवडाभरात 77 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जगभरात मंकीपॉक्सची लागण झालेल्या लोकांची संख्या 6,000 पेक्षा जास्त झाली आहे. तर आफ्रिकेच्या काही भागात या विषाणूमुळे दोन लोकांचा मृत्यू झाला आहे.

मंकीपॉक्सची सर्वाधिक प्रकरणे युरोप आणि आफ्रिकेत आढळून आली आहेत. संयुक्त राष्ट्राच्या आरोग्य एजन्सीने सांगितले की, मंकीपॉक्स हा गूढ रोग प्रामुख्याने पुरुषांनी पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवलेल्या पुरुषांना प्रभावित करतो.

Web Title: Central Government Health Secretary Writes To States Guidelines In Monitoring Monkeypox As Cases Rise

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..