
शिंदे सरकारचा मोठा निर्णय; पेट्रोल ५ तर डिझेल ३ रुपयांनी स्वस्त
Maharashtra Fuel Price News in Marathi
मुंबई - देशात मागील काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यानंतर केंद्र सरकारने दर कमी केले होते. तसेच देशातील अनेक राज्यांनी दर कपात केली होती. मात्र महाविकास आघाडी सरकारने केली नव्हती. आता आपण पेट्रोल पाच आणि डिझेल तीन रुपयांची दर कपात करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा: एकनाथ शिंदे गटाला हवी ‘वजनदार’ खाती
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बहुमत चाचणीच्या दिवशीच इंधनदर कपात करणार असल्याची घोषणा केली होती. त्यावर आज निर्णय घेण्यात आला आहे. शिंदे म्हणाले की, राज्य सरकारने पेट्रोल डिझेल VAT कमी केला आहे. त्यामुळे आता पेट्रोल प्रती लिटर पाच रुपये डिझेल प्रतीलिटर तीन रुपयांनी स्वस्त होणार आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीवर सहा हजार कोटींचा अतिरिक्त भार पडणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. (Petrol Diesel Price Maharashtra)
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी इंधनदर कपात केल्याचं म्हटलं. यावेळी फडणवीस याांनी आणीबाणीच्या काळात कारागृहात गेलेल्या लोकांसाठीची पेन्शन योजना पुन्हा सुरू करणार असल्याचं म्हटलं. महाविकास आघाडी सरकारने कोरोना काळातील आर्थिक अडचणीचं कारण देत ही पेन्शन योजना बंद केली होती.
ठाकरे सरकारचे निर्णय फिरवले
राज्यातील एकनाथ शिंदे सरकारने ठाकरे सरकारचे निर्णय पुन्हा बदलणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहे. यापैकी महाराष्ट्रातील सरपंचांची आणि नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय नव्या सरकारने घेतला आहे. ठाकरे सरकारने जनतेतून सरपंचांच्या आणि नगराध्यक्षांच्या निवडीचा निर्णय बदलला होता. या व्यतिरिक्त बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना अधिकार देण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे.
Web Title: Maharashtra Fuel Price Vat Petrol Diesel Eknath Shinde Devendra Fadnavis Government Cabinet Meeting
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..