

New Traffic Rules
ESakal
देशातील वाहतूक व्यवस्थापन सुधारण्यासाठी सरकारने कठोर उपाययोजना केल्या आहेत. वाहतुकीच्या नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या चालकांवर आता कडक कारवाई केली जाईल. नवीन नियमांनुसार, एका वर्षात पाच किंवा अधिक वेळा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकाला गंभीर गुन्हेगार म्हणून गणले जाईल. केंद्र सरकारने सुधारित केलेले केंद्रीय मोटार वाहन (तिसरी सुधारणा) नियम, २०२६, २० जानेवारी २०२६ पासून लागू होतील.