
रामेश्वरम : (पीटीआय) : ‘‘केंद्र सरकारने तमिळनाडूला दिल्या जाणाऱ्या निधीमध्ये वाढ केली असली तरी येथील सरकार निधी वाटपाच्या मुद्द्यावरून रडगाणे गात आहे. वास्तविक केंद्राने दिलेल्या वाढीव निधीमुळे राज्याच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासात मोठी भर पडली आहे,’’ असे सांगत स्टॅलिन यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली. त्रिभाषा धोरण, मतदारसंघ पुनर्रचना आणि निधी वाटपाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर केल्या गेलेल्या आरोपांचा त्यांनी समाचार घेतला.