

Family Pension Rules
ESakal
केंद्र सरकारने कुटुंब पेन्शनबाबत नवीन नियम जारी केले आहेत. जेणेकरून सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारकाच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला मिळणाऱ्या पेन्शनबाबत कोणताही गोंधळ होऊ नये. विशेषतः ज्या प्रकरणांमध्ये कर्मचाऱ्याला दोन किंवा अधिक बायका असतात, अशा प्रकरणांमध्ये पेन्शनवरून अनेकदा वाद निर्माण होतात आणि लोकांना न्यायालयात जावे लागते. आता सरकारने स्पष्ट केले आहे की पेन्शनसाठी कोण पात्र असेल, विशेषतः जोडीदाराच्या मृत्यूनंतर मुलांना कोणते अधिकार असतील. या नियमांमुळे पेन्शनच्या गरजांशी झुंजणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला दिलासा मिळेल.