India Visa Rules Major Change : भारतात राहण्यासाठी आता व्हिसा बंधनकारक! केंद्र सरकारकडून नियमांमध्ये मोठा बदल; 'या' ६ समुदायांवर होणार थेट परिणाम

MHA New Notification on Visa Exemption : अफगाणिस्तान, पाकिस्तान अन् बांगलादेशातून आलेल्या नागरिकांसाठी नवे निर्देश; नेपाळ-भूतान मार्गावरील प्रवासासाठीही नियम कडक!
Central Government's New Visa Rules

Central Government's New Visa Rules

Sakal

Updated on: 

Central Government's New Visa Rules : भारतामध्ये वास्तव्यास असलेल्या शेजारील देशांतील नागरिकांसाठी केंद्र सरकारने अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा धोरणात्मक बदल केला आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशातून भारतात दाखल झालेल्या सहा गैर-मुस्लिम समुदायांच्या नागरिकांना यापूर्वी देण्यात आलेली व्हिसा सवलत आता मागे घेण्यात आली असून, त्यांना भारतात राहण्यासाठी संबंधित श्रेणीतील वैध व्हिसा घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने (MHA) यासंदर्भात अधिकृत राजपत्रित अधिसूचना जारी केली आहे.

या निर्णयाचा थेट परिणाम भारतात आश्रयाला आलेल्या नागरिकांवर होणार असून, भारत, नेपाळ आणि भूतान दरम्यानच्या आंतरराष्ट्रीय प्रवासाचे नियमही अधिक कडक करण्यात आले आहेत.

Loading content, please wait...