कुतुबमिनार परिसरात खोदकामाचा विचार नाही; जी. किशन रेड्डी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

central government no excavation in Qutub Minar area G Kishan Reddy

कुतुबमिनार परिसरात खोदकामाचा विचार नाही; जी. किशन रेड्डी

नवी दिल्ली : दिल्लीतील कुतुबमिनारच्या परिसरात खोदकाम करण्याचा केंद्र सरकारचा कोणताही इरादा नाही, असे केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांनी स्पष्ट केले. काही दिवसांपूर्वी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी येथे पूर्वी मंदिर असल्याचा दावा करीत कुतुबमिनारच्या आवारात हनुमान चालीसाचे पठण केले होते.वाराणसीत ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण व अन्य प्रक्रिया सुरू झाल्यावर, तेथे एक पुरातन कारंजे आढळल्याचे व तेच काशी विश्वनाथाचे शिवलिंग असल्याचे दावे प्रतिदावे सुरू आहेत. यानंतर मथुरा, ताजमहाल, कुतुबमिनार व देशातील अनेक मशिदी व मुस्लिम शासनकाळातील ऐतिहासिक इमारतींबद्दचा वाद उफाळला आहे. कुतबमिनारबद्दल सोशल मीडियावर अफवांचे पेव फुटले आहे.

कुतुबमिनारच्या परिसरात खोदकाम करण्यात येणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर फिरत आहेत. भारतीय पुरातत्त्व विभागाचे ४ अधिकारी, ३ इतिहासकार, संशोधक आदींचे पथक येथे खोदकाम करणार आहे, येथे सापडणाऱ्या मूर्तींची आयकोनॉगग्राफी करण्यात येईल, अशा अनेक बातम्या सोशल मीडियावर फिरू लागल्या आहेत. याशिवाय सांस्कृतिक सचिव गोविंद मोहन यांनी एका टीमबरोबर अलीकडेच कुतुबमिनार परिसराची पाहणी केली, असेही सोशल मीडियावरच्या अफवेत म्हटले आहे.

मात्र सोशल मीडीयावरील कुतुबमिनारबाबतची सारी माहिती या अफवा आहेत, असे रेड्डी यांनी स्पष्टपणे सांगितले. कुतुबमिनारच्या आवारात खोदकाम करण्याबाबतचा कोणताही निर्णय केंद्र सरकारने घेतलेला नाही, असे सांगण्यात आले. दरम्यान सांस्कृतिक मंत्रालयाचा हवाला देऊन सोशल मीडियावर याबाबतचा मजकूर फिरत आहे. त्यामुळे त्यावर केंद्र सरकार कोणती कायदेशीर कारवाई करणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कुतुबमिनार परिसरात यापूर्वी १९९१ मध्ये खोदकाम करण्यात आले होते. मात्र त्याची कारणे वेगळी होती, असे पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Web Title: Central Government No Excavation In Qutub Minar Area G Kishan Reddy

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top