

House Building Advance Scheme
ESakal
जवळजवळ प्रत्येकाचे स्वतःचे घर असण्याचे स्वप्न असते. वाढत्या मालमत्तेच्या किमतींमुळे सामान्य लोकांना घर परवडणे कठीण होत चालले आहे. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना घर खरेदी करणे थोडे सोपे जाते. केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना हाऊस बिल्डिंग अॅडव्हान्स (HBA) योजनेअंतर्गत अत्यंत कमी व्याजदराने गृहकर्ज देते. केंद्र सरकारचे कर्मचारी स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.