केंद्र सरकारने टीव्ही संच आयातीवर निर्बंध 

वृत्तसंस्था
Monday, 3 August 2020

केंद्र सरकारने रंगीत टीव्ही संचांच्या आयातीवर निर्बंध घातले आहेत. यामुळे देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन मिळून चीन आणि व्हीएतनाममधून होणाऱ्या आयातीला फटका बसण्याची शक्यता आहे. 

नवी दिल्ली - केंद्र सरकारने रंगीत टीव्ही संचांच्या आयातीवर निर्बंध घातले आहेत. यामुळे देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन मिळून चीन आणि व्हीएतनाममधून होणाऱ्या आयातीला फटका बसण्याची शक्यता आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप       

भारताने गेल्या वर्षात व्हीएतनाममधून (४२.८० कोटी डॉलर) आणि चीनमधून (२९.२० कोटी डॉलर) टीव्ही संचांची मोठ्या प्रमाणात आयात केली होती. टीव्ही संचाच्या आयातीचे मुक्त धोरण बदलून त्यावर निर्बंध घातल्याचे परकी व्यापार विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. त्यामुळे आता टीव्ही संच आयात करण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी आवश्‍यक ठरणार आहे. त्यासाठीच्या प्रक्रियेबाबत लवकरच नवी अधिसूचना जारी केली जाणार आहे. चीन आणि व्हिएतनाम व्यतिरिक्त मलेशिया, हाँगकाँग, कोरिया, थायलंड आणि जर्मनी या देशांकडूनही भारतात टीव्ही संच आयात केले जातात. 

देण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Central government restricts TV set imports