esakal | राज्यातील कोरोनावाढीवर केंद्राचा अहवाल; या कारणांमुळे महाराष्ट्रात वाढला कोरोना

बोलून बातमी शोधा

Maharashtra corona}

महाराष्ट्रात पुन्हा एकदा ही परिस्थिती का उद्भवत आहे, याची तपासणी करण्यासाठी केंद्र सरकारने पाहणीसाठी एक पथक पाठवलं होतं. 

राज्यातील कोरोनावाढीवर केंद्राचा अहवाल; या कारणांमुळे महाराष्ट्रात वाढला कोरोना
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसतो आहे. खासकरुन महाराष्ट्र आणि  पंजाब या दोन राज्यांत कोरोना रुग्णांची वाढ होताना दिसत आहे. कोरोनाची परिस्थिती गेल्या महिन्यात नियंत्रणात येईल, अशी चिन्हे दिसत असतानाच कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा ही परिस्थिती का उद्भवत आहे, याची तपासणी करण्यासाठी केंद्र सरकारने पाहणीसाठी एक पथक पाठवलं होतं. 

काय आहे अहवाल?
केंद्रीय पथकाच्या पाहणीनंतर कोरोना संपला आहे, असं समजून लोकांचा वाढता निष्काळजीपणा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या झालेल्या निवडणुका, लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये झालेली वाढ ही कारणे कारणीभूत आहेत. तसेच लोकलसह इतर सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरु करणे अशा काही गोष्टींमुळे कोरोनाचा संसर्ग वाढला असल्याचं निरिक्षण केंद्रीय पथकाने नोंदवलं आहे. लोकलमधील गर्दीमुळे मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा फैलाव होत असल्याचं केंद्रीय पथकाने अहवालात प्रामुख्याने म्हटलं आहे. तसेच राज्यातील आरोग्य यंत्रणा देखील आता खुप गांभीर्याने काम करत नसल्याचं केंद्रीय पथकाने या अहवालात नमूद केलं आहे. 

हेही वाचा - मराठा आरक्षण : सुप्रीम कोर्टात आजपासून मॅरेथॉन सुनावणीला सुरवात; असं आहे वेळापत्रक
राज्य सरकारला दिशानिर्देश
राज्य सरकारने कोरोना चाचण्यांची संख्या वाढवली पाहिजे, रुग्णांचा शोध घ्यायला हवा, कोरोना संबंधीच्या नियमांचे काटेकोरपण पालन करायला हवे, अशा सूचना केंद्रीय पथकाने केल्या आहेत. काँटॅक्ट ट्रेसिंगवर भर देणे आणि लसीकरण सुरू ठेवणे, असेही उपाय या केंद्रीय पथकाने सुचवलं आहे.

महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये केंद्राची पथके
महाराष्ट्र आणि पंजाबमधील कोरोनाचा संसर्ग वाढल्याने केंद्राने या दोन्ही राज्यांमध्ये तातडीने विशेष आरोग्य पथके  पाठवले होते. ही संबंधित राज्य सरकारांच्या मदतीने संसर्गाची साथ नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करतील तसेच याबाबत आरोग्य मंत्रालयाला नियमित अहवाल देतील. या पथकात डॉक्‍टर व आरोग्य तज्ज्ञांसह भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) तज्ज्ञांचाही समावेश आहे. 

काय आहे सध्याची परिस्थिती?
राज्यात काल रविवारी 11,141 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे तसेच नवीन 6,013 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 20,68,044 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 97,983 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.17% झाले आहे.