महागाई भत्ता वाढला, लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी Good News |dearness allowance | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

money epfo pf account india

महागाई भत्ता वाढला, लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी Good News

नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी (central govt employee) एका आनंदाची बातमी आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्रीय कर्मचाऱ्यांना तीन टक्के वाढीव महागाई भत्ता (dearness allowance hike) आणि डीआर मंजूर केला आहे. याचा लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना लाभ होणार आहे. बेसिक वेतन पेन्शनवर सध्या २८ टक्के महागाई भत्ता मिळतो. त्यात आणखी तीन टक्के वाढ करण्यात आली आहे.

४७.१४ लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६८.६२ लाख पेन्शनधारकांना याच लाभ मिळणार आहे. यामुळे सरकारी तिजोरीवर ९,४८८.७० कोटी रुपयांचा भार येणार आहे. आज दिवसाच्या सुरुवातील मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यानंतर डीए आणि डीआरमध्ये वाढ करण्यात आली. जुलै २०२१ मध्ये वर्षभरानंतर सरकारने प्रलंबित असलेली डीए आणि डीआरमध्ये वाढ केली होती.

कोविडमुळे अर्थव्यवस्थेचे नुकसान झाल्याने २०२० मध्ये केंद्र सरकारने महागाई भत्ता आणि डीआरची वाढ रोखून धरली होती. जुलैमध्ये झालेल्या डीए, डीआर वाढीचा लाखो कर्मचाऱ्यांना फायदा झाला होता. एक जुलै २०२१ पासून ही वाढ लागू झाली होती. १७ वरुन २८ टक्के महागाई भत्ता झाला होता. यामुळे तिजोरीवर ३४,४०० कोटीचा भार पडला होता. ताज्या मंजुरीनंतर महागाई भत्ता आता ३१ टक्के झाला आहे.

टॅग्स :central govt