गर्भपात, अफेअरच्या बातम्या देणाऱ्या युट्यूब चॅनल्सना समंथाचा दणका | Samantha | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Samantha Ruth Prabhu

गर्भपात, अफेअरच्या बातम्या देणाऱ्या युट्यूब चॅनल्सना समंथाचा दणका

लखनऊ: अभिनेता नागा चैतन्य (naga chaitanya) बरोबर झालेल्या घटस्फोटामुळे चर्चेत असलेली अभिनेत्री समंथा (Samantha) सध्या खास मैत्रीण शिल्पा रेड्डी सोबत अध्यात्मिक सहलीवर आहे. समंथा लवकरच तिच्याविरोधात खोट्या बातम्या पसरवणाऱ्या युट्यूब चॅनल्स (YouTube channels) विरोधात कारवाई करणार आहे. अनेक युट्यूब चॅनल्सनी समंथाचे विवाहबाह्य संबंध असून तिने गर्भपात (abortions) केल्याच्या बातम्या दिल्या होत्या. संमथा कारवाई करणार असल्याच्या वृत्ताला तिच्या पीआरने दुजोरा दिला आहे.

एकापेक्षा जास्त युट्यूब चॅनल्सना तिने नोटीस पाठवली आहे. समंथा सध्या तिची जवळची मैत्रीण शिल्पा रेड्डी सोबत ऋषीकेश येथे आहे. तिने इन्स्टाग्रामवरुन तिच्या या अध्यात्मिक सहलीचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. नवोदित दिग्दर्शकांसोबत समंथा काम करणार आहे. अनेक चित्रपटांसाठी तिला करारबद्ध करण्यात आले आहे.

समंथाने अनेक युट्यूब चॅनल्सना मानहानी केल्याप्रकरणी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. तिच्या पीआरने ही माहिती दिली. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे. समंथाने नागा चैतन्यपासून विभक्त होणार असल्याचे जाहीर केल्यापासून अनेक चॅनल्सनी स्वत:ची थिअरी मांडली होती.

अनेक व्हिडीओसमधून संमथाचे विवाहबाह्य संबंध असून तिने गर्भपात केल्याचा आरोप करण्यात आला होता. सुमन टीव्हीला सुद्धा समंथाने कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्याशिवाय तिच्यावर गर्भपाताचा आरोप करणारे वकील वेंकट राव यांना सुद्धा समंथाने नोटीस पाठवली आहे.

टॅग्स :samantha