
खाद्यतेल १५ रुपयांनी स्वस्त होणार? केंद्राने संघटनांना दिले निर्देश
Edible Oil Price Cut : वाढत्या महागाईच्या काळात लवकरत खाद्यतेलाच्या किमती कमी होण्याची अपेक्षा आणखी वाढली आहे. केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या दरात तात्काळ 15 रुपयांनी कपात करण्याचे आदेश खाद्यतेल संघटनेला जारी केले आहेत. अन्न आणि पुरवठा मंत्रालयाने खाद्यतेल संघटनेला खाद्यतेलाच्या किमतीतील कपातीचा लाभ त्वरित ग्राहकांना देण्यास सांगितले आहे. 6 जून 2022 रोजी, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली ज्यामध्ये सर्व मोठ्या खाद्यतेल संघटनांना खाद्यतेलाच्या किमतीत तात्काळ 15 रुपयांनी कपात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
केंद्र सरकारने उत्पादक कंपन्या आणि रिफायनर्सना वितरकांनाही किमती कमी करण्यास सांगितले जेणेकरून किमती कमी झाल्याचा फायदा मिळण्यास कोणतीही अडचण येऊ नये. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने खाद्यतेल संघटनांना सांगितले आहे की वितरकांसाठी किंमती कमी होताच त्याचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि ही माहिती विभागाला नियमितपणे उपलब्ध करून द्यावी. मंत्रालयाने म्हटले आहे की ज्या कंपन्यांनी आतापर्यंत किमती कमी केल्या नाहीत आणि ज्यांची एमआरपी इतर ब्रँडपेक्षा जास्त आहे त्यांनीही किमती तात्काळ कमी कराव्यात.
हेही वाचा: संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या! अटक वॉरंट जारी
अन्न आणि सार्वजनिक वितरण
विभागाने आपल्या बैठकीत आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या किमती खाली येत असल्याचे मान्य केले, जे खाद्यतेलाच्या किमतीच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक आहे. अशा परिस्थितीत देशांतर्गत बाजारपेठेत खाद्यतेलाच्या किमती कमी झाल्या पाहिजेत आणि त्याचा फायदा ग्राहकांपर्यंत कोणत्याही अडथळ्यांशिवाय पोहोचला पाहिजे, याची खातरजमा खाद्यतेल कंपन्यांनी केली पाहिजे, असे सरकारने म्हटले आहे.
हेही वाचा: शिंदे गटाच्या आमदाराचा बॅनरवर घोळ, दिघेंच्या जागी प्रसाद ओकचा फोटो
Web Title: Centre Directs Leading Edible Oil Associations To Reduce Prices By 15 Rupees Per Liter
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..