

10-Minute Delivery Rule
No More 10-Minute Delivery: भारतात आता १० मिनिटांच्या डिलिव्हरीचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. केंद्रीय कामगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी विविध डिलिव्हरी प्लॅटफॉर्मसोबत घेतलेल्या बैठकांनंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे आता संपूर्ण भारतात १० मिनिटांत डिलीव्हरी देणं बंधणकारक नसणार आहे.
यासंदर्भात आज केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी ब्लिंकिट, झेप्टो, स्विगी आणि झोमॅटोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. डिलिव्हरीसाठी ठरवलेली वेळेची मर्यादा हटवावी, अशी सूचना त्यांनी कंपन्यांना केली. त्यानुसार सर्व कंपन्यांनी आपल्या ब्रँड जाहिराती आणि सोशल मीडियावरून डिलिव्हरीची वेळेची मर्यादा काढून टाकण्याचे आश्वासन सरकारला दिले आहे.