esakal | कोरोनानं झालेल्या मृत्यूच्या आकड्यांशी केंद्राचा संबंध नाही - आरोग्य मंत्रालय
sakal

बोलून बातमी शोधा

Mansukh Mandviya

कोरोनानं झालेल्या मृत्यूच्या आकड्यांशी केंद्राचा संबंध नाही - आरोग्य मंत्रालय

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : विरोधकांकडून केंद्रानं कोरोनाबाधित मृतांचे आकडे लपवल्याचा वारंवार आरोप केला जात आहे. यावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं मंगळवारी राज्यसभेत उत्तर दिलं. आरोग्यमंत्री मनसुख मांडवी म्हणाले, "केंद्रानं कधीही राज्यांना कोरोनाचे मृत्यू कमी दाखवायला किंवा लपवायला सांगितलं नाही. उलट राज्यांकडूनचं याबाबतची आकडेवारी केंद्राकडे पाठवली जाते." (Centre never asked any state to record less deaths or cases Health Minister aau85)

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत सरकारला याबाबत सवाल केला होता. त्यांनी म्हटलं होतं की, "सरकारनं कोरोनाच्या मृतांचे आकडे का लपवत आहे? हे आम्हाला सांगावं. कारण काही अहवालांनुसार, कोरोनामुळं मृत्यू पावलेल्यांची संख्या सरकारी आकड्यांपेक्षा कितीतरी अधिक आहे." यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय राज्यसभेत म्हणाले, "आरोग्य हा विषय राज्यांच्या अखत्यारितील आहे. सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश विस्तृत दिशानिर्देशांच्या आधारे सातत्याने कोरोना रुग्णांच्या संख्येची आणि मृत्यूदराची आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे पाठवत असतात. दरम्यान, कुठल्याही राज्याकडून अथवा केंद्र शासित प्रदेशाकडून ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणाचा मृत्यू झाल्याचं सांगितलेलं नाही."

"आमच्या सरकारनं कायमचं म्हटलं की, कोरोनाचं हे संकट राजकारणाचं कारण बनता कामा नये. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे की जेव्हा १३० कोटी भारतीय एक पाऊल पुढे टाकतील तेव्हा देश १३० कोटी पावलं पुढे जाऊ शकतो. जेव्हा आपण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा करतो तेव्हा देशातील १३० कोटी सर्वसामान्य लोकांना सर्व राज्य सरकारांनी सर्वसंमतीनं एक निर्णय घ्यावा लागेल की आम्ही आमच्या देशात तिसरी लाट येऊ देणार नाही. आपला संकल्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्हाला कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेपासून वाचवू शकतो"

loading image