esakal | मुलांवर कोरोनाच्या गंभीर परिणामांची अद्याप स्पष्टता नाही - केंद्र सरकार
sakal

बोलून बातमी शोधा

corona infection child

मुलांवर कोरोनाच्या गंभीर परिणामांची स्पष्टता नाही - केंद्र सरकार

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : देशातील संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा (corona third wave) लहान मुलांवर मोठा परिणाम होईल असे अद्याप कोणतेही संकेत मिळालेले नाहीत, असं केंद्र सकारनं स्पष्ट केलं आहे. बालरोगतज्ज्ञांच्या (pediatricians) म्हणण्यानुसार, हा दावा तथ्यांवर आधारित नाही. त्यामुळे कदाचित लहान मुलांवर तिसऱ्या लाटेचा मोठा परिणाम होणारही नाही, त्यामुळे लोकांनी घाबरण्याचं कारण नाही, असं एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी स्पष्ट केलं आहे. (Centre says No indication third COVID wave will severely affect children)

हेही वाचा: समलैंगिक जोडप्यांच्या विवाह नोंदणीवरुन केंद्राची ताठर भूमिका?

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये ज्येष्ठ नागरिकांवर परिणाम झाला होता. त्यानंतर दुसऱ्या लाटेमध्ये सर्वाधिक परिणाम तरुण वर्गावर झाला. त्यानंतर आता तिसऱ्या लाटेचे लहान मुलांवर धोकादायक परिणाम होतील असंही सांगितलं जात आहे.

देशात १४ वर्षांपर्यंतची लोकसंख्या ३३ टक्के

भारतात १४ वर्षांखालील लोकसंख्या २६ टक्के आहे. तर जवळपास ७ टक्के लोकसंख्या ही पाच वर्षांखालील मुलांची आहे. मात्र, तिसऱ्या लाटेची संभाव्य भीती लक्षात घेता देशातील काही प्रमुख शहरांनी लहानमुलांसाठी डेडिकेटेट कोविड केअर सेंटर्स उभारली असून काही ठिकाणी ती उभारण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांकडून २४ तास लशीकरणाचे संकेत

दरम्यान, तिसऱ्या लाटेचा लहान मुलांवरील संभाव्य धोका लक्षात घेता नेमलेल्या बालरोगतज्ज्ञांच्या टास्कफोर्ससह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी ऑनलाईन बैठक घेतली. यावेळी मुलांवरील परिणामांबाबत विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी १८ ते ४४ वयोगटातील लोकांसाठी लशीकरण तूर्तास पुरेशा लशींअभावी बंद असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसेच जून महिन्यापर्यंत लशींचा पुरवठा सुरळीत होईल अशीही त्यांनी व्यक्त केली. तसेच लस पुरवठा व्यवस्थित सुरु झाल्यास राज्यात २४ तास लसीकरण मोहिम राबवण्याचे संकेतही त्यांनी दिले.

loading image
go to top