Cervical Cancer Vaccine : महिलांचा जीव मोलाचा! सीरमकडून पहिली मेड इन इंडिया 'HPV' लस लाँच

याबाबत सीरमचे सीईओ अदर पुनावाला यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे.
Cervical Cancer Vaccine
Cervical Cancer VaccineSakal

Cervical Cancer Vaccine : विविध आजारांना रोखण्यासाठी सीरमच्या लसींनी मोलाची भूमिका बजावली आहे. नुकत्याच उद्भवलेल्या कोरोना काळातही सीरमने कोविशिल्ड लस बाजारात आणून करोडो लोकांचे जीव वाचवले आहेत. ( First Made In india Cervical Cancer Vaccine Launched )

हेही वाचा : ..या शहरात सापडतात शेकडो रोनाल्डो आणि मेस्सी

Cervical Cancer Vaccine
Strong Earthquake In Delhi : राजधानी दिल्लीत जोरदार भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीती

त्यानंतर आता सीरमकडून मेड इन इंडिया HPV लस लाँच करण्यात आली आहे. याबाबत सीरमचे सीईओ अदर पुनावाला यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. या लसीमुळे महिलांमधील सर्विकल कॅन्सर म्हणजेच गर्भाशायाच्या कॅन्सरपासून बचाव होण्यास मदत होणार आहे.

आज राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जात आहे. तसेच या महिन्यात गर्भाशयाच्या कॅन्सरबाबत जागरूकतादेखील केली जात आहे. या दिवसाचे महत्व लक्षात घेता सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पहिली मेड-इन-इंडिया HPV लस लाँच केली आहे, असे अदार पूनावाला यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे.

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा भारतातील 15 ते 44 वयोगटातील महिलांमध्ये आढळून येणारा दुसरा सर्वात सामान्य कर्करोग आहे. मात्र, या लसीमुळे महिलांचे आरोग्य सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.

किती असणार किंमत

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुनावाला यांनी या लसीच्या किमतीबाबत भाष्य केले होते. त्यावेळी ते म्हणाले होते की, आपल्या देशातच पहिल्यांदा ही लस दिली जाईल त्यानंतर ती जगभरातील देशांना पाठवली जाईल. या लसीची किंमत २०० रुपये ते ४०० रुपयांच्या दरम्यान असेल, पण अद्याप किंमतींवर अंतिम शिक्कामोर्तब झालेलं नाही. २ वर्षात २०० मिलियन डोस आम्ही तयार करण्याचा कंपनीचा मानस असल्याचेही पुनावाला यांनी स्पष्ट केले होते.

Cervical Cancer Vaccine
Mumbai News : प्रजासत्ताक दिनी मुंबईवर हवाई हल्ल्याचा धोका; शिवाजी पार्कबाबत मोठा निर्णय

दर ८ मिनिटाला एका महिलेचा होतो मृत्यू

गर्भाशयाच्या कर्करोगाविरूद्ध भारतातील पहिल्या कॉड्रिव्हेलंट ह्यूमन पॅपिलोमाव्हायरस वॅक्सिन (qHPV) ला नुकतीच भारताच्या ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI)ने मार्केट ऑथरायजेशनसाठी मंजूरी दिली आहे.

या एचपीव्ही लसीचा उद्देश महिलांना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून वाचवणे हा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे देशात दर आठ मिनिटांनी एका महिलेचा मृत्यू होतो. हा आजार टाळता येऊ शकतो, पण तो लवकर ओळखला तरच ते शक्य असून आणि ते सापडताच त्याच्यावर योग्य उपचार होणे गरजेचे असते.

Cervical Cancer Vaccine
Pune News : सिंहगड रोड परिसरात गोळीबाराने खळबळ; एक जखमी

कशी असेल लस?

सध्या जगभरात गर्भाशयाच्या कर्करोगासाठी दोन लसी उपलब्ध आहेत. पहिली क्वाड्रिव्हॅलेंट लस आणि दुसरी बायव्हॅलेंट लस आहे. हेपॅटायटीस बी लसीप्रमाणेच VLP (Virus-like particles) ही लस आहे. या लसीच्या आगमनामुळं गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यास मदत होणार असून या कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी होणार असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com