Strong Earthquake In Delhi : राजधानी दिल्लीत जोरदार भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Earthquake

Strong Earthquake In Delhi : राजधानी दिल्लीत जोरदार भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीती

Strong Earthquake In Delhi : राजधानी दिल्लीसह परिसरात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा : ..या शहरात सापडतात शेकडो रोनाल्डो आणि मेस्सी

या घटनेत अद्यापपर्यंत किती नुकसान झाले किंवा जीवितहानी झाली आहे याची ठोस माहिती आलेली नाही.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दिल्ली-एनसीआरमध्ये मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. 

हेही वाचा: Mumbai News : प्रजासत्ताक दिनी मुंबईवर हवाई हल्ल्याचा धोका; शिवाजी पार्कबाबत मोठा निर्णय

भूकंपाचे हे धक्के उत्तर प्रदेशसह उत्तराखंडमध्येही अनेक ठिकाणी जाणवले. उत्तराखंडची राजधानी डेहराडून, पिथौरागढ आणि अल्मोडा येथेही भूकंपाचे धक्के जाणवल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.8 इतकी मोजली गेली आहे.

हेही वाचा: Pune News : सिंहगड रोड परिसरात गोळीबाराने खळबळ; एक जखमी

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.8 इतकी मोजली गेली आहे. नेपाळमधील कालिका येथे भूकंपाचे केंद्र असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचा केंद्रबिंदू जमिनीच्या पृष्ठभागापासून 10 किलोमीटर आत होता.

५.८ रिश्टर स्केलच्या या भूकंपाचे धक्के नेपाळशिवाय भारतातील अनेक शहरांमध्ये सुमारे ३० सेकंद जाणवले. राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेशातील अनेक शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. उत्तराखंडमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.

हेही वाचा: Jio 5G : जिओचे सर्वात मोठं लाँचिंग; सांगली, कोल्हापूरसह 'या' ठिकाणी सुरू झाली 5G सेवा

उत्तराखंडमधील जोशीमठलाही या भूकंपाचा फटका बसू शकतो. याची पुष्टी झाली नसली तरी भूकंपाचा केंद्रबिंदू जोशीमठपासून अवघ्या २४० किमी अंतरावर होता आणि त्याची तीव्रताही खूप जास्त होती. भूकंपाचा केंद्रबिंदू उत्तर प्रदेशची राजधानी लखनौपासून 300 किमी अंतरावर होता.

टॅग्स :Earthquakedelhi