जागतिक दर्जाची एअरलाइन तयार करण्यासाठी उत्सुक - टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Natarajan Chandrasekaran

एअर इंडियाला जागतिक दर्जाची एअरलाइन बनवण्यासाठी उत्सुक - एन. चंद्रशेखरन

एअर इंडियाची मालकी टाटा समूहाकडे आली आहे. ही प्रक्रिया आज पूर्ण झाल्यानंतर टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन (Natarajan Chandrasekaran) यांनी आम्हाला आनंद झालाय, अशी प्रतिक्रिया प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

"टाटा समूहात एअर इंडिया परत आल्याने आम्हाला आनंद झाला आहे. जागतिक दर्जाची एअरलाइन तयार करण्यासाठी आम्ही सर्वांसोबत चालण्यास उत्सुक आहोत", असे एन चंद्रशेखरन म्हणाले.

हेही वाचा: श्रीनगर : व्यवसायिक ईमारतीला भीषण आग; अग्निशामक दलाचा जवान जखमी

कर्जात बुडालेल्या सरकारी विमान कंपनी एअर इंडियासाठी टाटा सन्स या कंपनीची निविदा मंजूर करण्यात आली होती. एअर इंडियासाठी १८००० कोटीची बोली टाटा समूहाने लावली. जेआरडी टाटा (J. R. D. Tata) यांनी १९३२ मध्ये टाटा एअरलाइन्सची स्थापना केली होती तर १९५३ मध्ये या कंपनीचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले होते. आता सात दशकांनंतर पुन्हा एकदा एअर इंडियाची मालकी टाटा समूहाकडे आल्याने टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी आनंद व्यक्त केलाय.

Web Title: Chairman Of Tata Sons N Chandrasekharans Reaction After Taking Handover Of Air India

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top