दम असेल तर तृणमूलच्या चिन्हावर लढा; काँग्रेसचं १२ आमदारांना आव्हान | Meghalaya | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दम असेल तर तृणमूलच्या चिन्हावर लढा; काँग्रेसचं १२ आमदारांना आव्हान

2018 च्या विधानसभा निवडणुकीत एकही जागा न जिंकलेल्या ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष आता थेट विधानसभेत प्रमुख विरोधी पक्ष ठरला आहे.

दम असेल तर तृणमूलच्या चिन्हावर लढा; काँग्रेसचं १२ आमदारांना आव्हान

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मेघालयात माजी मुख्यमंत्र्यांसह १२ काँग्रेस आमदार तृणमूल काँग्रेसमध्ये गेले आहेत. यामुळे तृणमूल काँग्रेस २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत एकही जागा न जिंकता मेघालयच्या विधानसभेत प्रमुख विरोधी पक्ष ठरला आहे. आता मेघालयातलं राजकारण तापलं आहे. काँग्रेसनं ममता बॅनर्जी यांच्यावर घोडेबाजार केल्याचा आरोप केला आहे.

काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी म्हटलं की, ममता बॅनर्जी या घोडेबाजार करत आहेत. मी आव्हान देतो की त्यांच्या आमदारांमध्ये हिंमत असेल तर काँग्रेसचं निवडणूक चिन्ह सोडून तृणमूलच्या तिकिटावर लढवून दाखवावं. मुकुल संगमा, लुइजिनो फलेरिओ आणि प्रशांत किशोर मिळून हे षडयंत्र रचत आहेत. या नॉर्थ इस्ट नेत्यांना मी ओळखतो दिवसा एक आणि रात्री वेगळंच असतं असंही अधीर रंजन यांनी म्हटलं.

मी ममता बॅनर्जी यांना आव्हान देतो की, त्यांनी आधी आमदारांना तृणमूलच्या निवडणूक चिन्हावर जिंकवून दाखवावं. त्यानंतर त्यांना पक्षात घ्यावं असंही काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी म्हणाले.

काँग्रेसला उद्ध्वस्त करण्याचं हे षडयंत्र फक्त मेघालयातच नाही तर नॉर्थ इस्टच्या सर्व राज्यात होत आहे. आधीपासूनच मेघायलयात हे होणार माहिती होतं. तृणमूलमध्ये गेलेले आमदार हे काँग्रेसच्या चिन्हावर जिंकले असल्याचंही अधीर रंजन यांनी सांगितलं.

हेही वाचा: मेघालयात ममतांचा काँग्रेसवर 'स्ट्राइक'; 17 पैकी 12 आमदार तृणमूलमध्ये

मेघायलाचे माजी मुख्यमंत्री संगमा हे सप्टेंबरमध्ये शिलाँग लोकसभा मतदारसंघातील खासदार विन्सेंट ए पाला यांना काँग्रेसनं प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त केल्यानं नाराज होते. संगमा यांनी गेल्या महिन्यात तृणमूल काँग्रेसचे महासचिव अभिषेक बॅनर्जी यांच्याशी चर्चा केली होती.

loading image
go to top