
Uttarakhand News: रात्रीतून पूर आला अन् संपूर्ण गाव उद्ध्वस्त झालं. एका आईची दोन जुळी लेकरं आईला बिलगलेल्या अवस्थेत ढिगाऱ्याखालून काढली. हे चित्र बघून गाव हळहळलं. उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील फली गावातली ही घटना आहे. इथे अचानक आलेल्या पुरामुळे होत्याचं नव्हतं झालं.