Champai Soren: हेमंत सोरेन यांचा राजीनामा; चंपाई सोरेन होणार झारखंडचे नवे मुख्यमंत्री

Champai Soren to be the new Chief Minister: चंपाई सोरेन झारखंडचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. हेमंत सोरेन यांनी आज राजभवन येथे येऊन आपल्या पदाचा राजीनामा दिला.
Champai Soren to be the new Chief Minister of Jharkhand hemant soren
Champai Soren to be the new Chief Minister of Jharkhand hemant soren

रांची- चंपाई सोरेन झारखंडचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. हेमंत सोरेन यांनी आज राजभवन येथे येऊन आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आमदारांनी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून चंपाई सोरेन यांची निवड केली. आजच शपथविधी सोहळा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे झारखंडमध्ये झालेली ही मोठी उलाथपालथ म्हणावी लागेल. (Champai Soren to be the new Chief Minister of Jharkhand hemant soren)

हेमंत सोरेन यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ईडीने त्यांना १० वेळा समन्स पाठवला होता. त्यामुळे ते मुख्यमंत्रीपद सोडतील हे निश्चित होतं. चंपाई सोरेन यांना ४१ आमदारांचे समर्थन आहे. झारखंडमध्ये एकूण आमदारांची संख्या ८० आहे. सोरेन यांनी राजभवन येथे येऊन राजीनामा दिल्यानंतर त्यांना ईडीने ताब्यात घेतले होते. झारखंडच्या मु्ख्यमंत्रीपदी हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन या विराजमान होतील अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. पण, दुसरे एक नाव चर्चेत होते. ते म्हणजे चंपाई सोरेन यांचे. ते कोण आहेत हे आपण जाणून घेऊया.

Champai Soren to be the new Chief Minister of Jharkhand hemant soren
Hemant Soren Arrested: झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीकडून अटक?

कोण आहेत चंपाई सोरेन?

चंपाई सोरेन झारखंड सरकारमध्ये मंत्री होते. ते सरायकेला येथून आमदार आहेत. त्यांना झारखंडचे टायगर म्हणून देखील ओळखलं जातं. चंपाई सोरेने यांचे वडील शिबू सोरेन यांचे सहकारी होते. हेमंत सोरेन सार्वजनिक कार्यक्रमात चंपाई सोरेन यांचे चरण स्पर्श करत असल्याचं पाहायला मिळायचं. हेमंत सोरेन आणि चंपाई सोरेन यांच्यात काका-पुतण्या सारखे संबंध आहेत. हेमंत सोरेन चंपाई यांचा सल्ला ऐकतात असं सांगितलं जातं.

Champai Soren to be the new Chief Minister of Jharkhand hemant soren
Hemant Soren: ईडीला सापडली कार, पत्नी होणार मुख्यमंत्री? हेमंत सोरेन गायब झाल्यापासून ४० तासात काय घडलं?

चंपाई सोरेन हे १९९१ मध्ये पहिल्यांदाच अपक्ष आमदार झाले होते. त्यानंतर १९९५ मध्ये ते झारखंड मुक्ती मोर्चाच्या तिकीटावर निवडून आले. २००० मध्ये भाजप नेत्याच्या विरोधात त्यांचा पराभव झाला होता. पण, २००५ पासून ते सलग सरायकेला येथून आमदार आहेत. चंपाई सोरेन यांचा जन्म १९५६ मध्ये झाला होता. त्यांचे शिक्षण दहावीपर्यंत झालं आहे. त्यांना चार मुलं आणि तीन मुली आहेत. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com