Rajasthan Election: सरदारपुरात गेहलोतच ‘सरदार’, भाजपकडून विरोधात प्रभावी उमेदवार नाही

सरदारपुरा हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. १९८० पासून आत्तापर्यंत झालेल्या दहापैकी सातवेळा या मतदार संघातून काँग्रेसचा उमेदवार विजयी झालेला आहे.
Rajasthan Election
Rajasthan Electionsakal
Updated on

एखाद्या राज्यातील विधानसभा निवडणूक असेल तर त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ कोणता, ते विजयी होतील का नाही? त्यांच्या विरोधात कोण? असे अनेक प्रश्न पडतात. राजस्थानमध्येही त्याचीच उत्सुकता आहे. राजस्थानचे मुख्यमंत्रिपद तीन वेळा भूषविलेले काँग्रेस नेते अशोक गेहलोत हे सरदारपुरामधून सलग सहाव्यांदा रिंगणात असून या मतदार संघाचे तेच ‘सरदार’ असल्याचे दिसून येते.

सरदारपुरा हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. १९८० पासून आत्तापर्यंत झालेल्या दहापैकी सातवेळा या मतदार संघातून काँग्रेसचा उमेदवार विजयी झालेला आहे. त्यापैकी मागील सलग पाच निवडणुकांपासून गेहलोत हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहे. एकदा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर राज्यभर प्रचारासाठी फिरणारे गेहलोत प्रचाराची सांगता त्यांच्या मतदारसंघात करतात. (Latest Marathi News)

त्यानुसार कालही त्यांनी मतदारसंघाला भेट देऊन प्रचाराची सांगता केली. जोधपूरच्या विकासात गेहलोत यांचे मोठे योगदान असल्याचे येथील अनेक जणांचे म्हणणे आहे. जिल्ह्याच्या या ठिकाणी चांगले रस्ते आहेत, पिण्याची पाण्याची तक्रार नाही, ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या शहराचा चेहरामोहरा त्यांनीच बदलला आहे असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

Rajasthan Election
Rajasthan Election Voting : राजस्थानच्या 199 विधानसभा जागांसाठी आज मतदान; 1,863 उमेदवार रिंगणात, भाजप-काँग्रेसमध्ये 'काटे की टक्कर'

या शहराला लागून असलेला भाग अविकसित दिसत असला तरी सरदारपुरा आणि जोधपूर शहर गेल्या वीस वर्षांत प्रचंड बदलले आहे. या शहरात एम्स आणि आयआयटी सारख्या मोठ्या संस्था आल्या गेल्या, त्याचे श्रेयही स्थानिक गेहलोत यांना देतात. (Marathi Tajya Batmya)

प्रचार सांगता होते त्याचदिवशी, मतदार संघ पायी पिंजून काढणे हे गेहलोत यांचे आणखी एक वैशिष्ट्य. अगदी झोपडपट्टीपासून उचभ्रू वस्तीतही ते फेरफटका मारतात. याउलट भाजपकडून दरवेळी नवा चेहरा त्यांच्या विरोधात दिला जातो. मुळात त्यांचे काम बघून

Rajasthan Election
Rajasthan Election: राजस्थानमधील प्रचाराची सांगता; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, या निवडणुकीत जनता कोणाला देणार संधी

त्यांच्या विरोधात लढायलाच कोण तयार होत नसल्याची स्थिती आहे. यावेळी प्राध्यापक म्हणून दोन महिन्यांपूर्वी निवृत्त झालेले प्रोफेसर महेंद्रसिंग राठोड यांच्या गळ्यात भाजपने उमेदवारीची माळ घातली आहे.

लोकसभेवर वर्चस्व नाही

आतापर्यंत तीनवेळा मुख्यमंत्री राहिलेल्या गेहलोत यांना जोधपूर लोकसभा मतदारसंघावर मात्र वर्चस्व मिळवता आलेले नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत गेहलोत यांचे पुत्र वैभव यांचा दारुण पराभव झाला. वैभव हे सुमारे सव्वा दोन लाख मतांनी पराभूत झाले. राजस्थानमध्ये लोकसभेच्या २५ जागा आहेत, २०१८ मध्ये काँग्रेसचे सरकार सत्तेवर येऊनही काँग्रेसला राज्यातील लोकसभेची एकही जागा जिंकता आलेली नाही. २५ च्या २५ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत.

Rajasthan Election
Rajasthan Election: ऐन निवडणुकीत काँग्रेसला धक्का! अनेकांनी धरली भाजपची वाट; प्रभावी नेत्यांनाच डावललं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.