

चंदीगड: चंदीगडमध्ये असलेल्या भाजपच्या पंजाब प्रदेश कार्यालयाबाहेर बुधवारी सायंकाळी भीषण स्फोट झाला. कार्यालयाच्या शेजारी उभ्या असलेल्या एका अॅक्टिव्हा स्कूटीमध्ये हा स्फोट झाल्याची माहिती आहे. या घटनेनंतर एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्याच्या हातात स्फोटकं असल्याचं दिसून येतंय. सध्या पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. या घटनेमागे कोणाचा हात आहे, याचा शोध घेतला जातोय.