

bomb threat received via email.
Bomb Threat Reported at Multiple Chandigarh Schools : चंदीगडमध्ये बुधवारी शहरातील ९ हून अधिक प्रमुख शाळांना ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. अनेक शाळांना एकाच वेळी हे ईमेल मिळाल्याने शाळा प्रशासन, पालक घबराट निर्माण झाली.
यानंतर तातडीने खबरदारीचा उपाय म्हणून, सर्व शाळा रिकामी करण्यात आल्या आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी अनेक संस्थांनी सुट्टी जाहीर केली गेली. शाळांच्या अधिकृत ईमेलववर धमकीचा संदेश आला आहे.
धमकीच्या ईमेलमध्ये म्हटले होते की, शाळेच्या कॅम्पसमध्ये बॉम्ब ठेवण्यात आले आहेत. शाळा व्यवस्थापनाला ही माहिती कळताच त्यांनी तात्काळ चंदीगड पोलिसांना याबाबत माहिती दिली. तर संभाव्य धोक्याची गंभीरता लक्षात घेऊन, शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांना ताबडतोब सुरक्षित ठिकाणी हलवले.
अनेक शाळांनी परीक्षा आणि वर्ग रद्द केले, तर काहींनी पूर्ण दिवसाची सुट्टी जाहीर केली. पालकांनीही शाळांबाहेर मोठ्या संख्येने गर्दी केली, ज्यामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. माहिती मिळताच चंदीगड पोलिसांनी कारवाई केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.