
Thar Accident
Esakal
Accident News: भरधाव थारने रस्त्याकडेला उभा राहिलेल्या दोन सख्ख्या बहिणींना धडक दिली. या धडकेत मोठ्या बहिणीचा मृत्यू झाला असून लहान बहीण गंभीर जखमी झाली आहे. चंडिगढमध्ये सेक्टर ४६ इथं ही घटना घडलीय. दोन्ही चंडिगढमधील बुडैल परिसरात राहत होत्या. कॉलेजहून परतल्यानंतर रस्त्याकडेला रिक्षाची वाट बघत असताना त्यांना थारने धडक दिली. अपघातात एका मुलीचा मृत्यू झाल्यानं कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.