Tue, Jan 31, 2023

आंध्रचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू भावूक होऊन रडू लागले
आंध्रचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू भावूक होऊन रडू लागले
Published on : 19 November 2021, 11:03 am
अमरावती (आंध्र प्रदेश) : तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) अध्यक्ष तथा आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू (Chandrababu Naidu) हे आज शुक्रवारी (ता.१९) विधानसभेत भावूक झाले. जोपर्यंत पुन्हा मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत विधानसभेत पाऊल ठेवणार नसल्याचे त्यांनी या प्रसंगी घोषणा केली आहे. सत्ताधारी वायएसआरसीचे आमदार लक्ष्य करत होते. आता ते माझ्या कुटुंबालाही टार्गेट करित असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी विधानसभेत केला.दुसरीकडे वायएसआरसीने (YSRC) नायडूंचे हे नाटक असल्याचे म्हटले आहे.
आज पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत ते भावूक होऊन रडू लागल्याचे दिसले. माझ्या पत्नीचा वायएसआरसीकडून अपमान केला जात असल्याचा आरोप करित नायडू यांना रडू कोसळले.