चंद्राबाबूंची विमानतळावरच झडती; सुरक्षेत कपात

वृत्तसंस्था
शनिवार, 15 जून 2019

विजयवाडातील गन्नवरम विमानतळावर शुक्रवारी रात्री सुरक्षा रक्षकांकडून नायडूंची तपासणी करण्यात आली. विमानापर्यंत जाताना नायडूंना व्हीआयपी सुरक्षा पुरविण्यात येत होती. ही सुविधाही काढून घेण्यात आली आहे. आता चंद्राबाबू यांना सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे प्रवास करावा लागणार आहे.

विजयवाडा : मुख्यमंत्रीपद गमवावे लागल्यानंतर तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली असून, त्यांची शुक्रवारी रात्री विमानतळावर झडती घेण्यात आली.

विजयवाडातील गन्नवरम विमानतळावर शुक्रवारी रात्री सुरक्षा रक्षकांकडून नायडूंची तपासणी करण्यात आली. विमानापर्यंत जाताना नायडूंना व्हीआयपी सुरक्षा पुरविण्यात येत होती. ही सुविधाही काढून घेण्यात आली आहे. आता चंद्राबाबू यांना सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे प्रवास करावा लागणार आहे.

आंध्र प्रदेश विधानसभेतील विरोधी पक्षनेता असलेल्या चंद्राबाबू यांना झेड प्लस सुरक्षा आहे. 2003 मध्ये त्यांच्यावर झालेल्या नक्षलवादी हल्ल्यानंतर त्यांना ही सुरक्षा देण्यात आली होती. या सर्व घटनेनंतर टीडीपीने वायएसआर आणि भाजपवर आरोप करत द्वेषाचे राजकारण केले जात असल्याचे म्हटले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrababu Naidu security reduced VIP treatment snatched TDP cries foul