चंद्राबाबू नायडू आणि त्यांचा मुलगा नजरकैदेत

वृत्तसंस्था
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

सत्ताधारी वायएसआर काँग्रेसविरोधात चंद्राबाबू नायडू करणार असलेल्या आंदोलनामुळे त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. चंद्राबाबूंसह त्यांचा मुलगा नारा लोकेश यांनाही नजरकैदत ठेवण्यात आले आहे. चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वात टीडीपीकडून आत्मकूर येथे मोर्चा काढण्यात येणार होता.

हैदराबाद : आंध्र प्रदेशात तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यासह त्यांच्या मुलाला नदरकैदेत ठेवण्यात आले आहे. त्यांच्याकडून आज चलो आत्मकूर या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते, त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे.

सत्ताधारी वायएसआर काँग्रेसविरोधात चंद्राबाबू नायडू करणार असलेल्या आंदोलनामुळे त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. चंद्राबाबूंसह त्यांचा मुलगा नारा लोकेश यांनाही नजरकैदत ठेवण्यात आले आहे. चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वात टीडीपीकडून आत्मकूर येथे मोर्चा काढण्यात येणार होता. या मोर्चाची आक्रमकता पाहून प्रशासनाने नरसरावपेटा, सत्तनपल्ले, पालनाडू आणि गुरजला येथे जमावबंदी लागू केली आहे.

टीडीपीला मोर्चा काढण्यापासून रोखल्यानंतर चंद्राबाबू नायडू यांनी राज्यभरात 12 तासांचे उपोषण करण्याचे आवाहन करत राज्य सरकारच्या भूमिकेला विरोध केला आहे. राज्याचे डीजीपी गौतम सावंग यांनी मंगळवारी काही भागांत जमावबंदी लागू करण्याची सूचना करत बैठका आणि मोर्चांना परवानगी नाकारली. त्यानंतर आता चंद्राबाबू नायडू आणि त्यांच्या मुलालाही नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे आंध्र प्रदेशातील राजकीय वातावरण तापले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrababu Naidu son Nara Lokesh put under preventive detention in Andhra pradesh