
जगातल्या सर्वात सुरक्षित कार निर्मात्या कंपन्यांमध्ये वोल्वो, ऑडी, कॅडिलॅक, सुबारू, बीएमडब्लू यांचा समावेश आहे. यापैकीच वोल्वो कंपनीची एक्ससी ९० ही कार जगातल्या सर्वात सुरक्षित कारपैकी एक मानली जाते. याच गाडीतून प्रवास करणाऱ्या एकाच कुटुंबातील सहा जणांचा बंगळुरुत एका विचित्र अपघात मृत्यू झाला. ट्रकने कंटेनरला धडक दिल्यानंतर कंटेनर कारवर उलटला आणि यात कार कंटेनरखाली दबली. यात ६ जण दबले गेले आणि त्यांचा मृत्यू झाला.