esakal | माझ्या ताफ्यावर गोळ्या चालवण्यात आल्या; चंद्रशेखर आझाद यांचा गंभीर आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

chandrashekar azad.

उत्तर प्रदेशात आमच्या ताफ्यावर गोळ्या चालवण्यात आल्याचा गंभीर आरोप भीम आर्मीचे (Bhim Army) प्रमुख चंद्रशेखर आझाद (Chandrashekhar Azad) यांनी केला आहे

माझ्या ताफ्यावर गोळ्या चालवण्यात आल्या; चंद्रशेखर आझाद यांचा गंभीर आरोप

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- उत्तर प्रदेशात आमच्या ताफ्यावर गोळ्या चालवण्यात आल्याचा गंभीर आरोप भीम आर्मीचे (Bhim Army) प्रमुख चंद्रशेखर आझाद (Chandrashekhar Azad) यांनी केला आहे. आजाद यांनी ट्विट करुन हा आरोप केला आहे. बुलंदशहर निवडणुकीत आमचा उमेदवार उभा राहणार असल्याने विरोधी पक्ष घाबरले आहेत. आमच्या रॅलीमुळे त्यांची झोप उडाली आहे. त्यामुळे त्यांनी भ्याडपणाने आमच्या ताफ्यावर गोळ्या चालवल्या. विरोधकांना पराभव दिसत असल्याने ते हताश झाले आहेत. त्यांना वाटतं की वातावरण खराब व्हावं, पण आम्ही असं होऊ देणार नाही, असं ते म्हणाले आहेत. 

US Election 2020: डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, मी पिछाडीवर नाही, प्रचार चांगला सुरु...

3 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीचा सदस्य प्रचार करत होते, यावेळी त्यांच्या ताफ्यावर गोळ्या चालवण्यात आल्याचे आझाद म्हणाले. ज्या ताफ्यावर गोळ्या चालवण्यात आल्या, त्यात चंद्रशेखर आझादही होते का, हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. आझाद याच भागात एका रॅलीला संबोधित करणार होते. बुधवारपासून होणारी बिहार विधानसभा निवडणूक आणि पुढील महिन्यात उत्तर प्रदेशमध्ये 7 विधानसभेच्या जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी भीम आर्मीने आपले उमेदवार दिले आहेत.  अनेक प्रभावी दलित नेते या निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश करत आहेत. 

चंद्रशेखर आझाद यांनी बुलंदशहर पोटनिवडणुकीत हाजी यामीन यांना आपला उमेदवार बनवला आहे. दुसरीकडे बिहार विधानसभा निवडणुकीत भीम आर्मी 30 जागांवर निवडणूक लढवत आहे. बिहामध्ये आझाद राजेश रंजन उर्फ पप्पू यादव यांची जन अधिकार पार्टीच्या नेतृत्तातील प्रोग्रेसिव्ह डेमोक्रॅटिक अलायंसच्या बॅनरखाली निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. 

loading image
go to top