chandrayaan 2: ‘विक्रम’ अभी जिंदा है! यानाने काढले लँडरचे फोटो

टीम ई-सकाळ
रविवार, 8 सप्टेंबर 2019

नवी दिल्ली : चांद्रयान-२ मोहिमेतील विक्रम लँडरशी संपर्क तुटल्यामुळे तमाम भारतीयांची निराशा झाली होती. पण, भारतीयांसाठी समाधानाची बाब म्हणजे विक्रम लँडर चंद्रावर पोहोचला आहे. गेल्या काही तासांत विक्रम लँडरची अवस्था काय आहे? याची माहिती मिळवण्यात इस्रो या भारतीय अवकाश संशोधन संस्थेला यश आलंय. याबाबतची माहिती इस्रोची प्रमुख के. सीवन यांनी दिली आहे.

नवी दिल्ली : चांद्रयान-२ मोहिमेतील विक्रम लँडरशी संपर्क तुटल्यामुळे तमाम भारतीयांची निराशा झाली होती. पण, भारतीयांसाठी समाधानाची बाब म्हणजे विक्रम लँडर चंद्रावर पोहोचला आहे. गेल्या काही तासांत विक्रम लँडरची अवस्था काय आहे? याची माहिती मिळवण्यात इस्रो या भारतीय अवकाश संशोधन संस्थेला यश आलंय. याबाबतची माहिती इस्रोची प्रमुख के. सीवन यांनी दिली आहे.

इस्रो प्रमुखांनी काय दिली माहिती?
‘चांद्रयान-२’च्या ‘विक्रम’ लॅंडरचा ‘इस्रो’च्या मुख्यालयाशी संपर्क तुटला असला, तरी पुढील चौदा दिवस ‘विक्रम’शी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे ‘इस्रो’ने सांगितले होते. तसेच, मुख्य यान (ऑर्बिटर) चंद्राच्या कक्षेत कार्यक्षमतेने फिरत असून, ते सुस्थितीत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. काही तासांपूर्वी ऑर्बिटरने विक्रमच्या सध्याच्या स्थितीचा आढावा घेतला असून, काही फोटोही काढले आहेत. विक्रम लँडर चंद्रावर पोहोचले आहे, अशी माहिती सीवन यांनी दिली आहे. ते म्हणाले, ‘विक्रमचा पत्ता लागला असला तरी, ऑर्बिटर आणि लँडर यांचा संपर्क झालेला नाही. त्यामुळे इस्रो मुख्यालयाचा लँडरशी संपर्क होऊ शकत नाही. येत्या काही तासांत लँडर आणि ऑर्बिटरचा संपर्क होईल. त्यासाठी शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत.’ चांद्रभूमीपासून २.१ किलोमीटर अंतरावर असताना ‘चांद्रयान २’मधील विक्रम लॅंडरचा ‘इस्रो’च्या मुख्यालयाशी संपर्क तुटला होता. यामुळे भारताच्या चांद्रमोहिमेला मोठा धक्का बसला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याची मोहीम भारताने आखली होती. ही मोहीम यशस्वी होण्याची अजूनही इस्रो आणि भारतीयांना आशा आहे.

ऑर्बिटर सुस्थितीत
‘विक्रम’शी संपर्क तुटला असला तरी चंद्राच्या कक्षेत फिरत असलेला ऑर्बिटर सुस्थितीत आहे. ‘विक्रम’शी संपर्क तुटल्यानंतर या ऑर्बिटरबाबतही शंका उपस्थित झाली होती. मात्र, या ऑर्बायटरची स्थिती उत्तम असून, ते पूर्ण क्षमतेने काम करीत आहे, असे ‘इस्रो’ने पत्रकारांना सांगितले. या ऑर्बिटरचे वजन २३७९ किलो असून, ते चंद्राच्या पृष्ठभागापासून १०० किमी उंचीवरील कक्षेतून निरीक्षणे नोंदवत आहे. ‘विक्रम’शी संपर्क नसला तरी ऑर्बिटर मात्र कक्षेत फिरत असून, त्याच्याकडून बरीच माहिती मिळेल.  शिवाय, या ऑर्बिटरमध्ये बरेच इंधन बाकी असल्याने तो पुढील एक वर्ष नव्हे, तर साडेसात वर्षे चंद्राभोवती फिरेल, असे इस्रोकडून सांगण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chandrayaan 2 orbiter sent images of vikram lander isro chief k sivan information