Chandrayaan 3 Landing: "प्रिय ISRO..."; झोमॅटोकडून चांद्रयान-3 मोहिमेसाठी गोड संदेश!

Chandrayaan 3 Landing
Chandrayaan 3 Landing

Chandrayaan 3 Landing : भारतासोबत संपूर्ण जगाच्या नजरा इस्रोच्या चांद्रयान-3 या मोहिमेकडे लागल्या आहेत. जिथे चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगसाठी संपूर्ण देश प्रार्थना करत आहे. संपूर्ण आज देश खूप उत्साहित आहे. चांद्रयान-3 यशस्वीपणे उतरवून इस्रोने इतिहास रचावा, अशी देशवासियांची इच्छा आहे. फूड डिलिव्हरी अॅप झोमॅटोने भारताच्या चांद्रयान-3 च्या लँडिंगपूर्वी दही आणि साखरेचे चित्र पोस्ट करून उत्साह दाखवला आहे.

दही साखर भारतात शुभ मानल्या जाते. परिक्षेला किंवा कोणत्या ध्येयावर जाताना आपल्या देशात दही साखर देऊन शुभेच्छा दिल्या जातात. झोमॅटोने भारतीय अंतराळ संशोधन संस्थेसाठी एक गोड संदेश पोस्ट केला. "प्रिय इस्रो आज चांद्रयान -3 लँडिंगसाठी सर्व शुभेच्छा," असे संदेशात म्हटले आहे. यावेळी दही-साखरचा फोटो देखील झोमॅटोने ट्वीट केला आहे.

भारतासाठी आज ऐतिहासिक सोहळा आहे. आज थेट चंद्रावर तिरंगा फडकणार आहे. भारताची ही मोहीम जर यशस्वी झाली तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपली उपस्थिती दर्शविणारा भारत हा एकमेव देश असेल. तर चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरणारा भारत चौथा देश ठरेल. यापूर्वी अमेरिका, चीन आणि रशिया चंद्रावर यशस्वीरीत्या उतरले आहेत. (Chandrayaan 3 Landing)

Chandrayaan 3 Landing
Chandrayaan 3: चांद्रयान 3 च्या लँडिंगपूर्वीच सरकारी कंपनीनं रचला मोठा विक्रम, इतिहासात होणार नोंद

चांद्रयान-3  हे 14  जुलै रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आले. (latest marathi news)

चांद्रयान-3, सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्रावर उतरेल. भारतामध्ये याचे लाईव्ह प्रक्षेपण दाखवले जाणार आहे. चांद्रयान-2 चंद्रावर पोहोचण्याच्या काही क्षण आधी क्रॅश झाले होते. त्यामुळे आता चांद्रयान-3 कडून भारताला फार अपेक्षा आहेत. यानासाठी 20 मिनिटे फार महत्वाचे असणार आहेत.

Chandrayaan 3 Landing
Chandrayaan 3: आज घराघरांमध्ये टीव्हीवर अनुभवणार ऐतिहासिक क्षण; चांद्रयान-३ बद्दल उत्सुकता शिगेला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com