Chandrayaan 3 : आज घराघरांमध्ये टीव्हीवर अनुभवणार ऐतिहासिक क्षण; चांद्रयान-३ बद्दल उत्सुकता शिगेला

Mission Chandrayaan 3 : 'त्यामुळे' चंद्रावर घडणारी ही ऐतिहासिक घटना डोळ्यात सामावून घेण्यासाठी लहान-थोर सर्वच जण आतूर झाले आहेत.
Chandrayaan 3
Chandrayaan 3saptahik

Nagpur - गेल्या ४० दिवसांपासून घराघरांत चर्चा असलेल्या मिशन चांद्रयान-३ बद्दल नागपूरकरांमध्येही कमालीची चर्चा व उत्सुकता दिसून येत आहे. इतिहास घडविण्याच्या उंबरठ्यावर असलेले चांद्रयान-३ बुधवारी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सुरक्षितरित्या यशस्वी लँडिंग करणार काय, याबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे. त्यामुळे चंद्रावर घडणारी ही ऐतिहासिक घटना डोळ्यात सामावून घेण्यासाठी लहान-थोर सर्वच जण आतूर झाले आहेत.

Chandrayaan 3
Mumbai Pune Expressway Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर कार-कंटेनरचा भीषण अपघात; २ जणांचा दुर्दैवी मृत्यू, ४ जण जखमी

गेल्या १४ ऑगस्टला आकाशात झेपावलेले चांद्रयान-३ चंद्रावर ‘सॉफ्ट लँडिंग’ करून तिरंगा फडकविणार काय ? याबद्दल सर्वांच्याच मनात प्रचंड कुतूहल व उत्सुकता आहे.

चांद्रयान-३ बद्दल नागपूरकरांची उत्सुकता शिगेला

सर्वच जण भारताचे हे बहुप्रतीक्षित मिशन यशस्वी होण्याबद्दल प्रार्थना करीत आहेत. रशियाचे लुना-२५ मिशन अपयशी ठरल्यानंतर आता संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या चांद्रयान-३ कडे लागले आहे. इस्रो व भारतीय शास्त्रज्ञांच्या मेहनतीचे चीज होवो व सर्वांना गोड बातमी मिळो, अशी नागपूरकरांची इच्छा आहे.

Chandrayaan 3
INDIA Mumbai Meeting: केजरीवाल 'इंडिया'च्या मुंबईतल्या बैठकीला लावणार हजेरी; स्वतःचं सांगितली रणनिती

मिशन यशस्वी व्हावे, यासाठी शहरातील मंदिरांमध्येही खगोलप्रेमी नागपूरकर ईश्वरचरणी माथा टेकत आहेत. इस्रोने चांद्रयान-३ हे बुधवारी सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी लँडिंग करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी नागपूरकर निश्चितच त्यावेळी टीव्हीसमोर राहणार, यात शंका नाही.

चांद्रयान-३ मिशनचे लँडिंग यशस्वी झाल्यास, भारत हा अमेरिका, रशिया व चीननंतर चंद्रावर यशस्वी लँडिंग करणारा जगातला चौथा, तर दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणारा पहिला देश बनणार आहे.

रामन विज्ञान केंद्रानेही केली जय्यत तयारी

दरम्यान, गांधीसागर येथील रामन विज्ञान केंद्रानेही भारताच्या या महत्त्वाकांक्षी मिशनची जय्यत तयारी केली आहे. चांद्रयान-३ च्या लँडिंगचे सायंकाळी पाच वाजतापासून प्रदर्शनीच्या सभागृहातील टीव्हीवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

त्या अगोदर सकाळी ११ वाजता इस्रोचे शास्त्रज्ञ डॉ. जी. श्रीनिवासन यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रज्ञान रोव्हर मॉडेलचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. या दोन्ही कार्यक्रमांना शालेय विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहावे, असे आवाहन केंद्राचे शिक्षणाधिकारी अभिमन्यू भेलावे यांनी केले आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com