Fact Check: चंद्रावर उमटला अशोकस्तंभाचा ठसा! चांद्रयानाच्या पाऊलखुणांचा फोटो तुम्हीही शेअर केलाय का?

भारताच्या अंतराळ संशोधन संस्थेने प्रज्ञान रोव्हरमधून काढलेले फोटो व्हायरलं होत आहेत.
Fact Check: चंद्रावर उमटला अशोकस्तंभाचा ठसा! चांद्रयानाच्या पाऊलखुणांचा फोटो तुम्हीही शेअर केलाय का?
Updated on

Chandrayaan-3 Imprints:भारताची चांद्रयान-३ मोहीम यशस्वी झाली. त्यानंतर जगभरातून भारताच्या अंतराळ संशोधन संस्थेवर स्तुतीसुमनं उधळली जाऊ लागली. विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताचं भारताची मान गर्वाने उंच झाली.

दक्षिण ध्रुवासारख्या अवघड ठिकाणी आपलं यान उतरवणारा देश म्हणून भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण होता. मात्र, देशासाठी गौरवशाली असलेली मोहीम यशस्वीरित्या पार पडल्यावर चंद्रावरील पाठवण्यात आलेल्या 'प्रज्ञान' रोव्हरच्या कॅमेऱ्यामध्ये काढलेले काही फोटो व्हायरल होऊ लागले.

या व्हायरल फोटोमध्ये सांगण्यात येतय की 'भारताच्या रोव्हरच्या पाऊलखुणा चंद्रावर कायमस्वरुपी उमटल्या आहेत. चंद्रावर कोणत्याही प्रकारचं वातावरण नाही, त्यामुले या खुणा कधीही नाहीशा होणार नाहीत,' अशा आशयाचा संदेश त्या व्हायरल फोटोसोबत प्रसारित करण्यात येतोय.(Latest Marathi News)

या फोटोमध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर भारताचा अशोकस्तंभ आणि त्याखाली इस्रोचा लोगोदेखील छापलेला दिसतोय. त्यासोबत हा संदेश लिहिलाय की हा फोटो इस्रोने शेअर केलाय. मात्र, पडताळणी केली असता, हा दावा साफ खोटा ठरला आणि इस्रोने असा कोणताही फोटो शेअर केलेला नाही.

Fact Check: चंद्रावर उमटला अशोकस्तंभाचा ठसा! चांद्रयानाच्या पाऊलखुणांचा फोटो तुम्हीही शेअर केलाय का?
Putin Enemies : कुणाला दिलं विष, तर कुणावर भाडोत्री गुंडांचा हल्ला; पुतीन यांना विरोध करणाऱ्यांना असं गाठलं काळाने!

हा फोटो बारकाईने पाहिला असता, त्याखाली ज्याने हा फोटो बनवलाय त्याचे नाव स्पष्टपण दिसू शकते. आनंदाच्या भरात भारतीय लोक हा फोटो शेअर करत गेले, पण त्या फोटोमागची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न कोणीही केला नाही. (Latest Marathi News)

Fact Check: चंद्रावर उमटला अशोकस्तंभाचा ठसा! चांद्रयानाच्या पाऊलखुणांचा फोटो तुम्हीही शेअर केलाय का?
Rohit Pawar : शाहू महाराज पवारांच्या व्यासपीठावर येण्यामागे 'हे' आहे कारण...; रोहित पवारांनी दिलं स्पष्टीकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com