'चांद्रयान 2'ने टीपले आणखी दोन फोटो

वृत्तसंस्था
Tuesday, 27 August 2019

नवी दिल्ली : 'चांद्रयान 2'ने 22 ऑगस्टला चंद्रावरील काही भागाचे फोटो काढले होते. काल (ता. 26) चांद्रयान 2ने पुन्हा काही फोटो पाठविले आहेत. यात चंद्रावरील काही नवीन भाग पाहायला मिळत आहेत. हे फोटो 23 ऑगस्टचे असून काल इस्रोने ट्विट करून शेअर केले आहेत.

'चांद्रयान 2'मधून 4375 किमी अंतरावरून हे फोटो काढण्यात आले आहेत. चंद्राच्या पृष्ठभागावरील हे फोटो टेरेन मॅपिंग कॅमेराने काढण्यात आले आहेत. यात चंद्रावरील जॅक्सन, मॅच, कोरोलेव आणि मित्रा असे चार भाग दिसत आहेत. यापैकी मित्रा या भागाचे नाव भारतीय प्राध्यापक शिशीरकुमार मित्रा यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे.

चांद्रयान-2ने 20 ऑगस्टला चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. त्यानंतर चांद्रयान-2ने काढलेला चंद्राचा पहिला फोटो 22 ऑगस्टला भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) प्रसिद्ध केला आहे. यात अपोलो क्रेटर आणि मरे ओरिएण्टल बेसिन ही दोन ठिकाणे दिसली होती. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrayan 2 clicks another 2 photos