esakal | "CM नहीं PM बदलो! मुख्यमंत्री बदलण्याने मोदींचं अपयश झाकणार नाही"
sakal

बोलून बातमी शोधा

BJP

"CM नहीं PM बदलो! मुख्यमंत्री बदलण्याने मोदींचं अपयश झाकणार नाही"

sakal_logo
By
सुधीर काकडे

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी राजीनामा दिला आणि गुजरातमधील राजकीय वातावरण ढवळून निघालं. त्यांच्या राजीनाम्यानंतर गुजरातमध्ये भारतीय जनता पक्ष आता मुख्यमंत्री म्हणून कोणाला संधी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागुन होतं. आज भारतीय जनता पक्षाच्या बैठकीत हा निर्णय झाला असुन भुपेंद्र पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. विजय रुपाणी यांच्यासह भारतीय जनता पक्षाने मागच्या सहा महिन्यांत पाच मुख्यमंत्री बदलले आहेत, त्यामुळे एकीकडे या सगळ्या घडामोडी घडत असताना दुसरीकडे काँग्रेसने भाजप विरोधात जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे.

भाजपने मुख्यमंत्री बदलाचे सत्र सुरु केल्याने काँग्रेसने मुख्यमंत्री नाही तर पंतप्रधान बदला असे म्हणत #CM_नहीं_PM_बदलो असे म्हणत मोहीम सुरु केली. भारतीय जनता पक्षाला आपले अपयश लपवण्यासाठी मुख्यमंत्री बदलुन चालणार नाहीत, तर त्यासाठी पंतप्रधान बदलावा लागेल अशी बोचरी टीका केली आहे. काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन या आशयाचे ट्विट केले आहे. भारतीय जनता पक्ष सर्व आघाड्यांवर अपयशी ठरला असून आपले अपयश लपवण्यासाठी हा सगळा खटाटोप केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

हेही वाचा: मोदी-शहांचे निकटवर्तीय 'भुपेंद्र पटेल' नेमके आहेत तरी कोण?

भाजपने बदलले 'हे' पाच मुख्यमंत्री

भारतीय जनता पक्षाने आपली सत्ता असलेल्या अनेक राज्यांत मुख्यमंत्री बदलल्याचे पाहायला मिळाले आहे. मागच्या सहा महिन्यात भारतीय जनता पक्षाने पाच वेळा मुख्यमंत्री बदलले आहेत.

उत्तराखंड

१) उत्तराखंडचे मुख्यमंत्री असलेले त्रिवेंद्रसिंह रावत यांना मार्च महिन्यात आपल्या पदावरुन हटवून त्यांच्या जागी तिरथ सिंग रावत यांना संधी देण्यात आली.

२) तिरथसिंह रावत हे लोकसभा सदस्य होते, त्यामुळे त्यांना सहा महिन्यांच्या कालावधीत विधानसभा सदस्य होणे शक्य नव्हते. १४४ दिवसांतच तिरथसिंह रावत यांना राजीनामा द्यावा लागला

आसाम

३) मे महिन्यात आसाममध्ये सर्वानंद सोनोवाल यांच्या जागी हेमंत बिस्वा सरमा यांनी मुख्यमंत्री करण्यात आले.

कर्नाटक

४) कर्नाटकचे मुख्यमंत्री असलेल्या येडियुरप्पा यांनी देखील मागच्या काळात राजीनामा दिला.

गुजरात

५) त्यानंतर आता गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी राजीनामा दिला आहे.

loading image
go to top