
अंगठ्या आणि रत्न यांची विक्री करणारा छांगुर बाबाकडे १०० कोटींपेक्षा जास्त संपत्ती असल्याचं सांगण्यात येत आहे. उत्तर प्रदेशात राहणाऱ्या छांगुर बाबाचं नाव जमालुद्दीन असं आहे. एटीएसकडून त्याची चौकशी करण्यात आली असून छांगुर बाबा आणि त्याच्याशी संबंधित संस्थांच्या खात्यांमध्ये १०० कोटींपेक्षा जास्त रुपयांचे व्यवहार झाले आहेत.