esakal | कर्नाटकात पाठ्यपुस्तकातून टिपू सुलतानचा धडा गायब
sakal

बोलून बातमी शोधा

Chapter On Tipu Sultan Dropped From Class 7 Textbook In Karnataka

कर्नाटक सरकारने इयत्ता सातवीच्या पुस्तकातील टिपू सुलतनाचा धडा वगळण्यात आल्याचे सांगण्यात येत याहे. याबाबत एनडीटीव्हीने वृत्त दिले आहे. टिपू सुलतान याच्यासोबत हैदर अलीचा देखिल एक धडा वगळण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

कर्नाटकात पाठ्यपुस्तकातून टिपू सुलतानचा धडा गायब

sakal_logo
By
टीम ई सकाळ

बंगळुरु : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशात वाढत असून शाळा सुरु करण्याबाबत निर्णय होत नसल्याने अनेक राज्याचे सरकार ऑनलाईन शाळा भरवण्यावर आणि अभ्यासक्रम कमी करण्यावर भर देत आहेत. अशात कर्नाटक सरकारने इयत्ता सातवीच्या पुस्तकातील टिपू सुलतनाचा धडा वगळण्यात आल्याचे सांगण्यात येत याहे. याबाबत एनडीटीव्हीने वृत्त दिले आहे. टिपू सुलतान याच्यासोबत हैदर अलीचा देखिल एक धडा वगळण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

कर्नाटकात भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत आल्यावर सरकारकडून टिपू सुलतान यांचा धडा वगळण्याविषयी भाष्य करण्यात आले होते. त्यानंतरही मोठा वाद झाला होता. वाद झाल्यानंतर सरकारकडून एक समिती स्थापन करण्यात आली होती आणि त्या समितीकडून सूचना मागविण्यात आल्या होत्या. परंतु, आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अभ्यासक्रमाला कात्री लावण्यात आली असून अभ्यासक्रमामधून ३० टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर टिपू सुलतनाचा धडाही सातवीच्या अभ्यासक्रमातून वगळण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आता एकूण १२० दिवसांच्या नियमनानुसार नवीन अभ्यासक्रमाची आखणी करण्यात आलेली आहे.

-----------------
मॉडर्नाची लस अंतिम टप्प्यात; किती असेल एका डोसची किंमत?
----------------

दरम्यान, टिपू सुलतान आणि भाजपचा वाद नवीन नाही. यापूर्वीही कन्नड व सांस्कृतिक खात्यातर्फे दरवर्षी साजरी करण्यात येणारी टिपू सुलतान जयंती भाजप सरकार सत्तेवर येताच रद्द करण्याचा आदेश बजाविण्यात आला होता. काँग्रेस व युती सरकार कार्यकाळात विरोध डावलून टिपू सुलतान जयंती शासकीय पातळीवर साजरी केली जात होती. पण, राज्यात सत्तांतर घडल्यानंतर जयंती रद्द करण्यात आली होती. सुरुवातीला टिपू सुलतान जयंती केवळ अल्पसंख्यांक समाज साजरी करत असे, परंतु, जनता दल आणि काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यानंतर कन्नड आणि सांस्कृतिक विभागाकडेही जयंती साजरी करण्यास सुरुवात झाली. २०१६ पासून भाजप सरकार सत्तेत येईपर्यंत ही जयंती साजरी करण्यात येत होती. परंतु, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर जयंती रद्द करण्यात आली होती.

loading image
go to top