चारधाम यात्रा : ‘मोक्षा’साठी यात्रेकरूंचा मृत्यू; भाजप प्रवक्तांचे विधान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चारधाम यात्रा : ‘मोक्षा’साठी यात्रेकरूंचा मृत्यू; भाजप प्रवक्तांचे विधान

चारधाम यात्रा : ‘मोक्षा’साठी यात्रेकरूंचा मृत्यू; भाजप प्रवक्तांचे विधान

लोकं मोक्षाच्या इच्छेने चारधाम यात्रेला (Chardham Yatra) येतात. म्हणूनच ते आजार लपवतात आणि स्वतःला फिट सांगतात, असे भाजपचे प्रवक्ते शादाम शम्स म्हणाले. सरकारी आरोग्य सेवा सुरळीत आहे. सरकार प्रत्येक प्रवाशाच्या आरोग्याची काळजी घेत आहे. आजारी पडल्यास तत्काळ उपचार उपलब्ध करून देत आहे, असेही ते माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.

चारधाम यात्रेतील (Chardham Yatra) भाविकांच्या मृत्यूला मोक्षप्राप्तीशी जोडल्याबद्दल काँग्रेसने भाजपविरोधात आघाडी उघडली आहे. सरकारचे अपयश लपविण्यासाठी भाजप चुकीचे वक्तव्य करून संभ्रम पसरवत असल्याचा आरोप काँग्रेसने (Congress) केला. यात्रा मार्गावर आजारपणामुळे भाविकांचा मृत्यू झाला असेल; परंतु, यामुळे राज्यातील आरोग्यसेवेवर थेट प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हेही वाचा: देवेंद्र फडणवीस म्हणाले, टिका करताना भाषेचे भान राखले पाहिजे

भाजप (BJP) नेत्यांची विचार करण्याची शक्ती संपली आहे. चारधाम यात्रा मार्गावर गडबड आणि खराब आरोग्य, वाहतूक सेवांच्या सतत बातम्या येत असतात. भाजपचे नेते आपल्या सरकारचे दोष लपवण्यासाठी डोक्याशिवाय विधाने करीत आहेत, असे काँग्रेसच्या (Congress) गढवाल मंडळाच्या मीडिया प्रभारी गरिमा मेहरा दासौनी म्हणाल्या. चारधाम यात्रा २०२२ ची सुरुवात चार धामांचे दरवाजे उघडून झाली.

यात्रेत मोठ्या संख्येने प्रवासी येत आहेत. त्यांनी डॉक्टरांच्या सूचनांचे पालन केले पाहिजे. जेणेकरून त्यांचा प्रवास सुरक्षित होईल, असे केदारनाथमध्ये तैनात सिक्स सिग्माचे संचालक डॉ. प्रदीप भारद्वाज म्हणाले. हायपोथर्मियाचे आणखी रुग्ण येत आहेत. सर्दी आणि श्वासोच्छवासाच्या रुग्णांमध्येही वाढ होत आहे, असे डॉ. अनिता भारद्वाज यांनी सांगितले.

Web Title: Chardham Yatra Death Of Pilgrims For Salvation Statement Of Bjp Spokesperson

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :BjpCongressChardham Yatra
go to top