पुलवामा प्रकरणी 3500 पानी चार्जशीट; हल्ला 6 फेब्रुवारीला होणार होता पण...

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 25 August 2020

पुलवामा येथे ‘सीआरपीएफ’च्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आज जैशे महंमद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर याच्यासह १९ जणांविरोधात विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.

जम्मू- पुलवामा येथे ‘सीआरपीएफ’च्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आज जैशे महंमद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर याच्यासह १९ जणांविरोधात विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. पुलवामा हल्ल्याचा कट रचल्याचा आणि हल्ला घडवून आणल्याचा आरोप या सर्वांवर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी सुरुवातीला कोणतेही धागेदोरे नसताना ‘एनआयए’ने विविध ऑडिओ, व्हिडिओ पुरावे, विविध प्रकरणात अटक केलेल्या दहशतवाद्यांचे आणि त्यांच्या पाठिराख्यांचे जबाब यांचा अत्यंत सविस्तर अभ्यास करून आणि साखळीची एक एक कडी जोडत आरोप निश्‍चित केले आहेत. 

ट्रम्प 'उल्लू'सारखे बुद्धिमान; अमेरिकी राजकीय भाष्यकाराचा व्हिडिओ...

‘एनआयए’ने आज सादर केलेल्या साडे तेरा हजार पानी आरोपपत्रात पुलवामा प्रकरणात आतापर्यंत अटक केलेल्या अनेक व्यक्तींची नावे आहेत. यामध्ये प्रत्यक्ष हल्ला करणारा आत्मघाती दहशतवादी अदिल दार याला आश्रय देणारा, त्याचा अखेरचा व्हिडिओ चित्रीत करणारा यांचीही नावे आहेत. गेल्या वर्षी १४ फेब्रुवारीला झालेल्या या हल्ल्यासाठी दहशतवाद्यांनी २०० किलोची स्फोटके भरलेली गाडी ‘सीआरपीएफ’च्या ताफ्यावर धडकविली होती. यात चाळीस जवान हुतात्मा झाले होते. ‘एनआयए’चे सहसंचालक अनिल शुक्ला यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या प्रकरणातील अनेक बाबी उजेडात आणल्या. दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी वापरलेल्या बॅटरी, मोबाईल फोन आणि काही रसायने ऑनलाइन खरेदी केली होती. या प्रकरणी ‘एनआयए’ने आतापर्यंत सात जणांना अटक केली आहे. 

मसूद अजहर व्यतिरिक्त या आरोपपत्रात विविध चकमकींमध्ये मारल्या गेलेल्या सात दहशतवाद्यांचा आणि चार फरारींचा समावेश आहे. यातील दोघे जण अद्यापही जम्मू-काश्‍मीरमध्ये दडून बसले आहेत. अब्दुल्ला रौफ आणि अमर अल्वी या मसूद अजहरच्या दोन नातेवाईकांची नावेही कटामागील मुख्य सूत्रधार म्हणून या आरोपपत्रात आहेत.

अकोल्यातील तब्बल ५०० वर्ष पुरातण गोसावी गणेश मंदिर

पुलवामा आरोपपत्रामध्ये अनेक खुलासे करण्यात आले आहेत. 6 फेब्रुवारी 2019 रोजी हा हल्ला करण्याची योजना बनली होती. पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाईंड उमर फारुक आणि त्याची टीम हल्लासाठी पूर्णपणे तयार होती. पण, काही दिवस अगोदर काश्मीरमध्ये हिमवर्षाव (स्नोफॉल) सुरु झाला. त्यामुळे हाईवे बंद झाला होता. या कारणाने हा हल्ला 14 फेब्रुवारी रोजी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chargesheet filed in Pulwama case Accused of attacking 19 people including Masood Azhar