
छत्तीसगढमध्ये भाजपा नेत्याने केलेल्या एका विधानामुळे लवकरच वादाला तोंड फुटेल असं दिसतंय. या भाजपा नेत्याने लोकांना दारू ऐवजी भांग आणि गांजा घ्यायला सांगितलं. यामुळे बलात्कार, खूप, दरोडे असे गुन्हे घडणार नाहीत, असं विधानही या भाजपा नेत्याने केलंय. (Encourage use of Ganja and Cannabis to reduce crime)
छत्तीसगढचे भाजपा आमदार कृष्णमूर्ती बांधी यांनी हे वादग्रस्त विधान केलंय. काँग्रेसने यावरुन भाजपाला धारेवर धरलंय. एक लोकप्रतिनिधीच नशा करण्याचा सल्ला कसा काय देऊ शकतो, असा सवाल काँग्रेसने उपस्थित केलाय. तर देशामध्ये गांजाला कायदेशीर मान्यता हवी असेल तर त्यांनी ही मागणी आपल्याच पक्षाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडे करावी, असा टोला छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी लगावला आहे.
देशभरात गांजाची विक्री करणं बेकायदेशीर आहे. मात्र गांजाच्या पानांपासून तयार केलेल्या भांगेच्या विक्रीवर कोणतीही कायदेशीर बंदी नाही. आमदार कृष्णमूर्ती बांधी म्हणाले की, हे माझं वैयक्तिक मत आहे. मी आधीही अशी मागणी सभागृहात केली होती. मी म्हणालो होतो की, अल्कोहोलमुळे बलात्कार, खून, भांडणं होतात. पण भांग पिणाऱ्यांनी कधी खून, बलात्कार, केला आहे का?
हे आमदार पुढे म्हणाले की, दारुबंदीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीने हा विचार करायला हवा की आपण भांग आणि गांजाच्या वापराकडे कसे वळू शकू. हे माझं वैयक्तिक मत आहे की जर लोकांना हे हवं आहे, तर त्यांना या गोष्टी द्यायला हव्यात, ज्यामुळे खून, बलात्कार किंवा इतर गुन्हे होणार नाहीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.