पेट्रोल पंपावर होतेय फसवणूक? गाडीत पेट्रोलऐवजी भरलं पाणी

वृत्तसेवा
गुरुवार, 2 जानेवारी 2020

पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढत असताना अनेक ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलमध्ये भेसळ होत असल्याचं समोर आलं आहे. हिमाचल प्रदेशमधल्या सोलन जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्र असलेल्या नालागड शहरात तर पेट्रोलऐवजी पाणी भरलं जात असल्याचं निदर्शनास आले आहे.

नालागड(सोलन)- पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढत असताना अनेक ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलमध्ये भेसळ होत असल्याचं समोर आलं आहे. हिमाचल प्रदेशमधल्या सोलन जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्र असलेल्या नालागड शहरात तर पेट्रोलऐवजी पाणी भरलं जात असल्याचं निदर्शनास आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यावेळी, स्थानिकांनी पेट्रोल पंपावरच्या कर्मचाऱ्याला पेट्रोलच्या ऐवजी  मशीनमधून पाणी निघत असल्याची विचारणा केली असता त्यानंही ते मान्य केलं. लोकांनी या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. सीएम हेल्पलाइनवर स्थानिकांनी या प्रकाराची तक्रार केली आहे. पेट्रोल पंपवाले पूर्ण पैसे घेत असून, पेट्रोलमध्ये पाण्याची भेसळ करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

लोकपालाच्या नावाखाली कोट्यवधींचा भुर्दंड

हा भयंकर प्रकार उजेडात आल्याने स्थानिक संतप्त झाले असून अशा गोष्टीमुळे गाड्या खराब होत आहेत. अशा पेट्रोल पंप मालकांविरोधात कठोरातली कठोर कारवाई केली गेली पाहिजे अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. त्या पेट्रोल पंप चालकांचा परवाना रद्द करण्यात यावा अशी मागणीही स्थानिकांनी लावून धरली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cheating on petrol pump in Himachal Pradesh