Kuno National Park : राजस्थानला पोहचलेली ‘ज्वाला’ स्वगृही; कुनो राष्ट्रीय उद्यानातून ओलांडली होती राज्याची सीमा
Cheetah Jwala : कुनो राष्ट्रीय उद्यानातील चित्तीण ‘ज्वाला’ने १०० किमीचा प्रवास करून राजस्थानमध्ये प्रवेश केला आणि शेळ्यांची शिकार केल्यानंतर वनविभागाने तिला सुरक्षितरीत्या पकडून परत आणले.
श्योपूर : कुनो राष्ट्रीय उद्यानाची राणी ज्वाला ही चित्त्याची मादी १०० किलोमीटर अंतर पार करून राजस्थानमधील सवाईमाधोपूर जिल्ह्यातील करीरा कलान गावात सोमवारी पोहोचली होती. वन विभागाने तिला आज परत स्वगृही आणले.