

Kuno National Park Welcomes New Cheetah Cubs From Botswana Lineage Taking Indias Cheetah Population To 60
esakal
मध्य प्रदेशातील कूनो राष्ट्रीय उद्यानात ‘प्रोजेक्ट चित्ता’ला आणखी एक मोठे यश मिळाले आहे. भारतात जन्मलेल्या KJP21 या ३२ महिन्यांच्या मादी चित्त्याने पाच सुदृढ बछड्यांना जन्म दिला आहे. या नव्या जन्मामुळे भारतातील चित्त्यांची एकूण संख्या ६० झाली असून, त्यापैकी ४१ चित्ते भारतात जन्मलेले आहेत.