

An emotional post by a Chennai IT manager about being asked to lay off 12 long-time team members - AI Image
esakal
Chennai: कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेला एक आदेश... हातात १२ कर्मचाऱ्यांची यादी... आणि प्रत्येकाला केवळ १५ मिनिटांच्या बैठकीत नोकरीवरून काढण्याची सूचना! चेन्नईतील एका आयटी कंपनीत डिलिव्हरी मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीची ही व्यथा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. आपला मोठा भाऊ समजून प्रेमाणे 'अण्णा' म्हणणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच नोकरीवरून काढण्याची जबाबदारी मॅनेजरवर सोपविण्यात आली होती.